नालासोपारा : पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेने ६५ किलो वजनाचे तांबे चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केली सविस्तर माहिती अशी कि विष्णु अर्जुन जाधव वय ६३ वर्षे, याच्या दिनांक १९ ते २०/८/२०२३ च्या दरम्यान बंद गाळयाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशाच्यातरी सहाय्याने उचकटुन आत प्रवेश करुन विष्णु जाधव यांच्या गाळयातुन २०,१५०/- रुपये किंमतीचे ६५ किलो वजनाचे तांबे चोरी करुन नेले याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा येथे दिनांक २५/०८/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहीती व गुप्त बातमीदार यांचेमार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी राहुल शिवबच्चन गुप्ता वय २४ वर्ष रा. नालासोपारा पुर्व ता.वसई यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता वर नमुद गुन्हायात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करुन त्याचेकडुन १७,३६० /- रुपये किंमतीचे ५६ किलो तांबे हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ – ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त सो, विरार विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, पेल्हार पोलीस ठाणे, श्री. विजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. शिवानंद देवकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) पेल्हार पोलीस ठाणे, स. पो. नि. सोपान पाटील, पो.हवा. गेश देशमुख, तानाजी चव्हाण, पो.अं.रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
