काशिमीरा : Redeem Point संदर्भातील Link Click च्या फसवणूक रक्कम रु.४०,०००/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश आले. अधिक माहितीनुसार
मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील . संतोश कुमार यांना रिडीम पॉईंट संदर्भात लिंक आली होती . त्यांनी सदरची लिंक क्लिक करून माहिती भरली असता त्यांच्या बँक खात्यातून ४०,००० /- रुपये काढून घेतले हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर गुन्हे कक्षात दिनांक १४/८/२०२३ रोजी तक्रार नोंदविली होती.
या तक्रारीची दखल घेत सायबर कक्षाने संतोश कुमार यांचे झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त केली व प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांच्या फसवणूक रक्कमेचा वापर करुन Paytm, Chroma द्वारे शॉपींग केली गेल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ पत्रव्यवहार व पाठपूरावा करुन नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली व पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश आले.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- Unknown Call/Link/Email विश्वासर्हता पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती उघड करू नये
- आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती देवू नये.
- अशा फसव्या लिंकवर क्लिक करु नका.
- अशा लिंक प्राप्त होताच बँकेसोबत संपर्क साधून पडताळणी करावी.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, स.पो.नि. स्वप्नील वाव्हळ, पो.उप.निरी. प्रसाद शेनोळकर, म.पो. हवा. माधुरी धिंडे, पो. अं. गणेश इलग, प्रविण आव्हाड, म.पो. अं. पल्लवी निकम, अमिना पठाण, सुवर्णा माळी, पो. अं. कुणाल सावळे, प्रशांत बोरकर यांनी पार पाडली आहे.
सायबर गुन्हे शाखा संपर्क क्रमांक :- ०२२-२८११ ०१३५
सायबर गुन्हे शाखा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक :- ९०० ४८८०१३५
सायबर गुन्हे शाखा ई-मेल आयडी :- cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in
