घोडबंदर : मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांस काशिमीरा पोलिसांनी केली अटक. अधिक माहितीनुसार घोडबंदर रोड, कासारवडवली, ठाणेयेथे राहणारे नोहर शिवराम काजरेकर हे दिनांक दि.२५/०८/२०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास फाउंटन सिग्नल येथील बसस्टॉप वरुन बसमध्ये बसत असताना त्यांचा खिशातील काळया रंगाचा रेडमी नोट – ०७ एस किंमत अंदाजे रुपये-५०००/-मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केला त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
काशिमीरा पोलिसांनी मा.वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास सुरु केला असता, तपासादरम्यान फोनबाबत तांत्रिक तपास करुन नमुद गुन्हयात १) जुबेर जाफर कच्ची वय २४ वर्षे, धंदा – बिगारीकाम रा – राबोडी, ठाणे यास घोडबंदर रोड येथून ताब्यात घेतले व त्याच्याकडे तपास केला असता तो मोबाईल त्यानेच चोरला असून त्यांस पोलिसांनी दिनांक २६/८/२०२३ रोजी अटक केली. सदर आरोपीला पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता त्याने फिर्यादी यांचा चोरी केलेला रेडमी नोट – ०७ एस मोबाईल फोन, आरोपी स्वत वापरत असलेला मोबाईल व इतर वेगवेगळया कंपनीचे १० असे एकुन – १२ मोबाईल फोन किं अं रुपये – ५९,०००/- हे त्याच्या घरातुन पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, श्री. महेश तरडे, सहा.पो.आयुक्त, मिरारोड विभाग, यांचा मार्गदर्शनाखाली संदिप कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिमिरा पोलीस ठाणे, समीर शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स.पो.नि. योगेश काळे, पो.उप निरी. शिवाजी खाडे, स.फौ.अनिल पवार, पो. हवा. दिपक वारे, प्रताप पाचुंदे, अक्षय पाटील, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, स्वप्निल मोहीले, निकम, पो. अं. रवी कांबळे, प्रविण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सुर्यवंशी यांनी केलेली आहे.
