तुळींज : अंमली पदार्थ विक्री करिता आलेल्या ०५ राजस्थानी नागरिकांना ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण २१,००,०००/- रुपये किमतीचा अंमली पदार्थ (एम.डी) जप्त तुळींज पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगीरी अधिक माहितीनुसार दिनांक २८/८/२०२३ रोजी तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार छपरीबन यांना त्यांच्या गुप्त माहीतीदाराकडुन माहीती मिळली कि प्रकाश भाडु नावाचा इसम त्याच्या राहत्या घरी रूम नं. ३०२ दत्त आशिर्वाद इमारत सेंट्रल पार्क या ठिकाणी एम. डी. नावाचे अंमली पदार्थाची विक्री करित असुन, अंमली पदार्थ खरेदी करण्याकिरता त्याच्या कडे ४ ते ५ राजस्थानी लोक आलेले आहेत. सदरबाबत त्यांनी लागलीच वपोनि / श्री शैलेंद्र नगरकर यांना माहीती दिली. वपोनि / नगरकर यांनी लागलीच पोनि/ सुधीर चव्हाण यांना छापा कारवाई करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे ,सदरबाबत मा. सहायक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने करण्याचे आदेश प्राप्त करुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने जावुन पाहणी केली असता, रूम नं. ३०२ दत्त आशिर्वाद इमारत दत्त नगर सेंट्रल पार्क नालासोपारा पूर्व या रूममध्ये असलेल्या ०५ इसमांना, ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता, १) दिनेशकुमार जावंताराम बिष्णोई वय ३१ वर्षे याच्या जवळ एकुण ५९ ग्रॅम वजनाचा एम. डी. अंमली पदार्थ ,२) सुनिल बिराराम बिष्णोई वय ३० वर्षे यांच्याकडे ५५ ग्रॅम वजनाचा एम. डी. अंमली पदार्थ ३) ओमप्रकाश क्रिष्णराम किलेरी वय ३० वर्षे याच्याकडे ५५ ग्रॅम वजनाचा एम. डी. अंमली पदार्थ,४) लादुराम हरिकिसन बिष्णोई वय ४० वर्षे याच्याजवळ २६ ग्रॅम एम. डी. अंमली पदार्थ ,तसेच ५) प्रकाशकुमार पुनमाराम बिष्णोई वय २३ वर्षे यांच्याकडे १५ ग्रॅम वजनाचा एम. डी. अंमली पदार्थ मिळुन आला आहे.
वर नमुद आरोपी यांच्या जवळ एकुण २१० ग्रॅम वजनाचा २१,००,००० /- रूपये किंमतीचा एम.डी. अंमली पदार्थ व मोबाईल फोन पोलिसांना मिळुन आले असुन सदरचा अंमली पदार्थ हा त्यांच्या ओळखीचा पाहिजे आरोपी प्रकाश बेलाराम भादु. रा. हेमागुडा ता. चितलवाना जि. सांचोर सध्या रा. रूम नं. ३०२ दत्त आशिर्वाद इमारत सेंट्रल पार्क नालासोपारा पूर्व याचेकडुन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदरचा अंमली पदार्थ राजस्थान येथे विक्री करित असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असुन आरोपी याचेविरूद्ध तुळींज पोलीस ठाणे गु दिनांक २८.०८.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री. पौर्णिमा चौगुले – श्रींगी मॅडम पोलीस उप आयुक्त साो, परीमंडळ-२ वसई, श्री. विनायक नरळे सहाय्यक पोलीस आयुक्त सो, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेंद्र नगरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुधीर चव्हाण, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे स.पो.नि. एम. डी. म्हात्रे, पो.उप निरी. बि. एस. बांदल, स.फौ. सुतनासे, पो. हवा. आनंद मोरे, प् उमेश वरठा, केंद्रे, पो.अं. कदम छपरीबन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
