मोटार सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात .

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News

नालासोपारा : मोटार सायकल चोरी करणाऱ्या साराईत गुन्हेगाराला अटक करण्यास आचोळे पोलीसांना यश. अधिक माहितीनुसार दिनांक ३० ते ३१/७/२०२३ रोजी रात्रीच्या दरम्यान दिपक जयप्रकाश विश्वकर्मा वय २५ वर्षे धंदा नोकरी रा. रुम नं. ०६, अंबावाडी चाळ, काजुपाडा, तुळीज रोड नालासोपारा पुर्व ता. वसई जि पालघर यांनी त्यांची   मोटार सायकल ही जिवदानी अपा. माऊली सर्वांसींग सेंटरच्या बाजुला, आचोळे गावं, नालासोपारा पुर्व येथे रोडवर उभी करून ठेवली होती तो कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली . याबाबत दिपक विश्वकर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून  आचोळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वसई-नालासोपारा परीसरात तसेच आचोळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने व सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे नमुद अज्ञात चोरट्याचा शोध घेत होते.त्याचवेळेस  दिनांक २०/०८/२०२३ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार आचोळे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलींग करीता फिरत असताना दरम्यान पो.स्टे हद्दीमध्ये अलकापुरी बाजार पटांगण, मुख्य रोडवरुन चंदन नाका बाजुकडे एक इसम संशयीत रित्या त्याच्या जवळील  एफ. झेड. मो.सा.क्र. एमएच ४८ बीएन ८०४४ हिचेवर जात असताना दिसुन आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला  थांबवुन त्याच नाव विचारले असता त्याने पवन अशोक मिश्रा ऊर्फ पवन गुरू वय-२९ वर्षे, रा. रूम नं. ६०३, बिल्डींग नं. ४,  ग्लोबलसिटी, विरार पश्चिम ता. वसई, जि. पालघर मुळ रा. गाव बारीगाव हनुमान नगर, बारीगाव डिई, तहसिल मडीयांहू, जि. जौनपुर, राज्य – उत्तर प्रदेश असे सांगीतले. सदर  इसमाच्या जवळ  एकुण १२ दुचाकी (मोटार सायकल) वाहनाच्या चाव्या मिळुन आल्या तसेच दुचाकी एफ. झेड. मो.सा.क्र. एमएच ४८ बीएन ८०४४ बाबत विचारपुस करता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणुन सखोल विचारपुस करता सदरची मोटार सायकल ही काही दिवसापूर्वी आचोळे पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी केल्याची आढळून आले त्यामुळे आरोपीस अटक करण्यात आली असून त्याची अधिक कौशल्यपुर्ण विचारपुस करुन सखोल तपास केला असता त्यांचेकडुन एकुण ५ मोटार सायकली एकुण १,९०,०००/- रुपये किंमतीच्या हस्तगत करुन आयुक्तालयातील एकुण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले – श्रींगी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ वसई, विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विवेक सोनवणे पोलीस निरीक्षक (गुन्हे), स.पो.नि. यशपाल सुर्यवंशी, पा.उप.नि. बुधव लोंढे, सुहास म्हात्रे, पो. हवा. दत्तात्रय दाईंगडे, शंकर शिंदे, प्रशांत सावदेकर, पो. अं. निखील चव्हाण, विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर, बाळु अव्हाड, मोहन पाईकराव यांनी केली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *