वसई : मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करुन ६ गुन्हांची उकल माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी. मिळालेल्या माहितीनुसार उमेश गजानन मोरे, वय ४५ वर्षे, यांनी दिनांक १५/०८/२०२३ रोजी ते दिनांक १६/०८/२०२३ दरम्यान के. मुव्ही स्टार गेटच्या समोर, अग्रवाल, वसई पश्चिम, जि. पालघर येथे त्यांची सुजुकी कंपनीची अॅक्सेस मोटार स्कुटी पार्क केली असता सदरची स्कुटी ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन माणिकपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदार व सि. सि.टि.व्ही. कॅमेऱ्यांच्या मदतीने सापळा रचुन वसई पश्चिम परिसरातुन आरोपी १) लहु लक्ष्मण राठोड, वय ३८ वर्षे, धंदा बिगारी काम, रा. रुम नं. ४०१ व्हाईट हाऊस बिल्डींग, माणिकपुर, दिवानमान, वसई पश्चिम, जि. पालघर यास ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हात अटक करण्यात आली . आरोपी याचा अधिक तपास केला असता त्याच्याकडुन त्याने इतर ठिकाणी चोरी केलेले ०२ मोबाईल फोन व ०५ मोटारसायकल असा एकुण रु १,४७,०००/- किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असुन माणिकपुर पोलीस ठाणे अभिलेखावरील एकुण ०६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई श्रीमती पौर्णिमा चौघुले – चिंगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, श्रीमती पद्मजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व श्री मिलिंद साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पो.उ.नि. सुनिल पाटील, पो. हवा. शैलेश पाटील, धनंजय चौधरी, शामेश चंदनशिवे, पो. अं. प्रविण कांदे, गोविंद लवटे, आनंदा गडदे यांनी केली आहे.
