पेल्हार : जबरी चोरी व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन ३ गुन्हांची उकल करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश.मिळालेल्या माहितीनुसार दि. ०९/०८/२०२३ रोजी पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत श्री. भानुचंद्र रामचंद्र यादव यांची रिक्षा हि गोपाल पाटील यांच्या शिवसेना ऑफिस समोर, बिलालपाडा, नालासोपारा पुर्व, ता. वसई जि. पालघर येथे सार्वजनिक रोडवर पार्क करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करुन चोरुन नेले या बाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींन विरुध्द पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्याचप्रमाणे दिनांक १५/०८/२०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास मुकेशकुमार अभिमन्यु राजपुत हे वाकनपाडा भाजी मार्केट, जवळ नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर भाजी खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांच्या समोरून चालत येणा-या एका अनोळखी इसमाने त्याच्या शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन जबरदस्तीने खेचुन घेवुन चोरुन पळून गेला त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीता विरुध्द पेल्हार पो.स्टे. गु. रजि. नं. ७६१/२०२३ भा.द.वि.स. कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
वरील दोन्ही गुन्ह्याचा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी१) अरबाज इस्माईल मेमन, वय- २३ वर्ष रा. मालवणी, मालाड, मुंबई २) राजीव रामचंद्र तिवारी, वय – ३४ वर्षे, रा. पेल्हार, नालासोपारा पुर्व ता.वसई जि.पालघर, ३) गंगाधर राजकुमार मिश्रा, वय – ३५ वर्षे, रा. संतोषभवन, नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर याना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच अधिक तपास केला असता आरोपींकडे चोरीस गेलेल्या बजाज कंपनीच्या दोन रिक्षा व एक मोबाईल फोन असा एकुण ९१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन पेल्हार पोलीस ठाणे अभिलेखावरील एकुण ३ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.अधिक तपास पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ – ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त सो, विरार विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, पेल्हार पोलीस ठाणे, श्री. विजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. शिवानंद देवकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) पेल्हार पोलीस ठाणे, पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. सोपान पाटील, पो.हवा. योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, पो.अं. रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
