अखेर अपहरण झालेल्या नाबालिक मुलीचा आचोळे पोलिसांनी लावला शोध.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Regional News

नालासोपारा : अपहृत मुलीचा यशस्वी रित्या शोध.मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०४/०७/२०२३ रोजी श्री. अखिलेश रामबाबु चौरसिया, वय ४० वर्षे, धंदा- नोकरी, रा.आदर्शनगर पडखळपाडा, आचोळे डोगरी, नालासोपारा पुर्व ता. वसई, जि. पालघर यांची मुलगी वय १६ वर्षे. हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तिने तीला  कशाचे तरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले अशी तक्रार दिल्यामुळे आचोळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

अपहरण चा गुन्हा दाखल झाल्यापासुन याचा प्रथम तपास पोउनि /संदिप भोसले यांनी केला होता परंतु अपहरण झालेली मुलगी अथवा आरोपी मिळुन आला नाही. त्यानंतर नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि / रेखा पाटील यांच्याकडे देण्यात आला नमुद तपासी अधिकारी यांनी गुन्हयाचा तपास हाती  घेतल्यानंतर अखिलेश रामबाबु चौरसिया यांच्या राहत्या परिसरात पुन्हा- पुन्हा जावुन तपास केला असता मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी पेन, ता. पनवेल, जि. रायगड येथे जावुन तपास करुन तसेच तांत्रिक विश्लेषण करुन साक्षीदार यांची तपासणी केली परंतु अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा मुरबाड व कुडवली एम.आय.डी.सी. मधील सुमारे १५० कंपीनीमध्ये मुलीचा शोध घेतला परंतु ती मुलगी मिळुन आली नाही म्हणुन एम.आय.डी.सी. परिसरातील कमी पैशामध्ये भाडे तत्वावर भेटणाऱ्या रुमबाबत पोलिस पथकाने  माहिती घेवून त्या परिसरातील सुमारे ७० रुम चेक केल्या असता एका रूम मध्ये अपहरण  झालेली मुलगी मिळुन आली तिला पोलीस ठाणे येथे घेवून येवून तिच्याकडे विचारपुस केली असता तिची एका मुलीशी मैत्री होती व ते अपहृत मुलीच्या आईस आवडत नव्हते म्हणुन तिचे आईवडील तीला पुढील शिक्षणासाठी गावी पाठविणार होते म्हणुन ती कोणास काहीएक न सांगता स्वतःहुन घरातुन निघुन जावून मुरबाड येथे कंपनीत काम शोधुन काम करत होती असे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अपहरण झालेली मुलगी सुखरुप तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात रितसर कारवाई करुन देण्यात आले आहे..

सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले – श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २ वसई, श्री. विनायक नरळे, सहा.पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब रा. पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे, पो. नि. विवेक सोनवणे (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरी. रेखा पाटील, व पो.अं. शिवराम शिंदे केली आहे.

 

 

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *