मिरा-भाईंदर : RUST DESK APP डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक रक्कम रु.९३०००/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश . मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोस्टे हद्दीतील श्री. अजय मर्चला हे ऑनलाईन ट्रेनचे तिकीट बुक करत होते. त्यावेळी त्यांच्या ट्रेनचे तिकीट बुक झाले नाही परंतू त्यांच्या बँक खात्यातून १६२७/- रुपये कट झाले. सदरची रक्कम परत मिळावी म्हणून त्यांनी गुगल वरुन 9334287978 हया नंबरवर कॉल केला. त्यानंतर त्यांना +916294662560 हया क्रमांकावरून कॉल येवून RUSK DESK App डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या क्रेडीट कार्डद्वारे ९३०००/- रुपयाची फसवणूक करण्यात आली त्यामुळे त्यांनी दि.०९/०८/२०२३ सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रार नोंदवली होती.
नमूद तक्रारीबाबत सायबर कक्षाने तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांच्या झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे फसवणूक रक्कमेचा वापर करुन RAZ * SAFE GOLD – PAYTM द्वारे शॉपींग केली गेल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ पत्रव्यवहार व पाठपूरावा करुन नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली पुन्हा तक्रारदार यांचे ९३००० /- रुपये मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- Google वरुन कस्टमर केअरचा नंबर घेवून त्यावर पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती उघड करू नये • आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती देवू नये.
- अशा फसव्याकॉल प्रतिसाद देवू नका.
- असे कॉल प्राप्त झाल्यास तात्काळ बँकेसोबत संपर्क साधावा.
सायबर कशाद्वारे मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात आले की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, स.पो.नि. स्वप्नील वाव्हळ, पो.उप.निरी. प्रसाद शेनोळकर, म.पो. हवा. माधुरी धिंडे, पो. अं. गणेश इलग, प्रविण आव्हाड, म.पो. अं. पल्लवी निकम, अमिना पठाण, सुवर्णा माळी, पो. अं. कुणाल सावळे, प्रशांत बोरकर यांनी पार पाडली आहे.
सायबर गुन्हे शाखा संपर्क क्रमांक :- ०२२-२८११ ०१३५
सायबर गुन्हे शाखा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक :- ९०० ४८८०१३५
सायबर गुन्हे शाखा ई-मेल आयडी :- cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in
