तलवारी,खंजीर आणि कोयते असे एकूण २७ हत्यारे बेकायदेशीर रित्या बाळगल्या प्रकरणी गुन्हेगारांना पोलिसांनी केले अटक.

Breaking News Crime News Cyber Crime Political News Regional News

नालासोपारा :  पेल्हार पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण शाखेची कागीरी – ०५ तलवारी, ०४ खंजीर, १८ कोयते अश्या अवैद्य शस्त्रासह दोन आरोपीत यांना अटक, मिळालेल्या माहिती नुसार पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एक अनोळखी इसम हा त्यांच्या हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याबाबत क्राईम न्युज या चॅनल वरती दिनांक ०३/०८/२०२३ व्हिडीओ प्रसारीत झाला होता. सदरची बाब ही अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याने सदर इसमावरती कायदेशिर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याप्रमाणे  गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच एटीसी पथकांचे अधिकारी व अंमलदार तसेच महिला अंमलदार असे पथक तयार करण्यात आली व  व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.

सदर पथकाने व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या इसमांचा पांडे नगर संतोषभवन परिसरात शोध घेतला असता व्हिडीओ मध्ये दिसणारा व्यक्तीचे नाव डॉन ऊर्फ कुलदिपसिंग रमेशसिंग रा. विशाल पांडे नगर, शिवाजी विद्यामंदीर शाळेजवळ, संतोषभवन, नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर असे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सदर आरोपी यांच्या राहत्या घरी मोठया प्रमाणात अवैद्य रित्या शस्त्र साठा असल्याची सपोनि सोपान पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर पोलीस पथकाने सदर इसमाच्या राहत्या घराची घरझडती घेतली असता त्यांच्या घरझडतीमध्ये ०३ तलवारी, ०४ खंजीर, १८ कोयते असे अवैद्य शस्त्र मिळुन आले आहेत. सदर गुन्हयातील दुसरा आरोपी राजविरसिंग पवनसिंग यांच्या पिकअप क्र. GJ 19Y 5408 च्या शिट खाली दोन तलवारी मिळुन आल्या असुन सदर अवैद्य शस्त्र व पिकअप ताब्यात घेण्यात आली आहे. सदर पोलीस कारवाई दरम्यान ०५ तलवारी, ०४ खंजीर, १८ कोयते ०१ पिकअप असा एकुण ३,६४,७५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाणे दि. ०४/०८/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांच्या  मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे श्री. वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. शिवानंद देवकर, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सोपान पाटील, पो.उप.निरी.प्रविण जगताप, पो. हवा. योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, राकेश शिरसाट, पो.अं. रवि वानखेडे, गोकुळ हटकर, राहुल कर्पे, सागर ढाकणे, निखील मंडलिक, किरण आव्हाड, दिलदार शेख, सुजय पाटील, महिला पोलीस अंमलदार रुपाली सकट, म. सु. ब. च्या महिला अंमलदार वैशाली केदारे, मिरा चंदनशिव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *