भाईंदर : मिरा-भाईंदर शहर पुर्णतः सी.सी.टि.व्ही. कॅमेराच्या नियंत्रणाखाली आणणेसाठी मिरा-भाईंदर महानगरपालीका यांनी भाईंदर पश्चिम येथील उड्डानपुला खाली सी. सी. टि. व्ही. कॅमेराच्या नियंत्रण कक्षाची निर्मिती केली आहे. दि. २२.०४.२०२३ रोजी पासुन सदर कक्ष कार्यान्वित आहे.
त्यानुसार नियोजीत सर्व ठिकाणी कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया महानगरपालीके मार्फत चालु आहे. सदर सी. सी. टी. व्ही. कंट्रोलरुमचा उपयोग करुन ऑनलाईन पध्दतीने कॅमेरा चेक करुन मिरा-भाईंदर शहरातील सार्वजनिक रोडवर वाहन चालकांना शिस्त लावणेकरीता कसुरदार वाहन चालकांवर वाहतुक शाखेमार्फत कारवाई चालु करण्यात आली आहे. त्यानुसार आता पर्यंत नियंत्रण कक्ष येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे मार्फत काशिमीरा वाहतूक विभागातर्फे दि. २२.०४.२०२३ ते आजपावेतो एकुण ३७४ कसुरदार वाहन चालकांविरुध्द मोटार वाहन कायदयाप्रमाणे कार्यवाही केलेली आहे.
तरी नागरीकांना काशिमीरा वाहतुक शाखे कडून आवाहन करण्यात येते की, आपण सी.सी.टि.व्ही. कॅमेराचे निगराणी खाली आहात, म्हणून मोटार वाहन कायदयान्वये होणारी ऑनलाईन कारवाई टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.
