विरार : एम.डी. ड्रग्स (मेथॅडॉन) नावाचा अंमली पदार्थ विक्री करणा-या आरोपींना अटक करण्यास विरार पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेला यश.अधिकमाहितीनुसार विरार पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दि ३१/०७/२०२३ रोजी ७. ०० च्या वाजताच्या सुमारास गुन्हे वाच पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली कि,ओल्ड विवा कॉलेज जवळच्या मैदानात दोन व्यक्ती एम. डी. ड्रग्स (मेॲडॉन) नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती .
त्यानुसार मिळालेल्या माहीतीबाबत मा. वपोनि राजेंद्र कांबळे, यांना सांगुन पोनि दिलीप राख (गुन्हे) व गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विरार पश्चिम येथील ओल्ड विवा कॉलेज जवळच्या मैदानात सापळा रचुन सदर ठिकाणावरुन १) ओमकार रामचंद्र तुळसकर २) मोनिश वसीम बेग यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन १०८००/- रु. किमतीचा अंदाजे चा ९.५५० ग्रॅम वजनाचा पांढ-या व लालसर रंगाचे लहान-लहान दाणे (साखरे सारखे दिसणारे) एम. डी. ड्रग्स (मेथॅडॉन) नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. नमुद वरील आरोपी यांच्या विरुद्ध विरार पोलीस ठाणे अंमली पदार्थ औषधे आणि मनोवैज्ञानिक पदार्थ अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, श्री. रामचंद्र देशमुख, सहा पोलीस आयुक्त, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप राख,पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि संदेश राणे, पो. हवा. सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, पो. अं. मोहसिन दिवान,, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, यांनी केली आहे.
