ईको कार व मोटार सायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना अटक करून लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत.

Breaking News Crime News Latest News Political News Regional News

विरार (दि.११) :  ईको कार व मोटार सायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना अटक करुन ३,३३,१००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. विरार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिकमाहितीनुसार  विरार पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे फिर्यादी हामीद अन्वर मकरानी यांनी जानी कम्पाउंड जवळ, प्रेमनगर, भोईरपाडा, जिवदानी रोड, विरार पूर्व याठिकाणी पार्क केलेली ईको कार व त्यामधील मुद्देमाल  अशी एकुण २,९८,१००/- रु. किं.ची मालमत्ता अज्ञात चोरटयाने चोरी केली होती याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाणेत गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या  तपासाच्या  अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे विरार पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील व आजुबाजुचे परिसरातील सी.सी.टि.व्ही.फुटेज पडताळणी केली असता सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे विरार पोलीस ठाणे रेकॉर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले. नमुद गुन्हातील चोरी केलेली इको कार ही आरोपी व त्याचे साथीदार याने वसई फाटा, वसई पुर्व येथे पार्क केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून  प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा कारवाई करुन आरोपी  १) सितारासिंग टक्कुसिंग टाक, रा. विरार पुर्व, २) चिमनसिंग घुँगरुसिंग टाक, रा. सदर यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याचे  निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आले असुन त्यांनी चोरी केलेली ईको कार व मोटार सायकल असा एकुण ३,३३,१००/- रुपये किंमती मुददेमाल हस्तगत करुन विरार पोलीस ठाणेत दाखल असलेले आणखी २ गुन्हयांची उकल करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. गायकवाड करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहा.पोलीस आयुक्त, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. राजेंद्र कांबळे, पो.नि. श्री. दिलीप राख (गुन्हे) तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पो.उप.नि. संदेश राणे, पो.हवा. सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, पो. अमं. मोहसिन दिवान, सचिन, बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *