विजेचे बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक झालेली रक्कम ०१,०१,६९८/- रुपये मिळविण्यात सायबर गुन्हे शाखेस यश.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Political News

काशिमीरा :  विजेचे बिल थकीत बिल अपडेट  करण्याची बतावणी करुन फसवणूक करण्यात आलेल्या रक्कमेमधील ०१,०१,६९८/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे शाखेस यश आले आहे अधिक माहितीनुसार काशिमिरा पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे श्री. हितेंद्र यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने संपर्क करुन “तुमचे इलेक्ट्रीसिटी बिल भरणा अपडेट झालेले नाही. तात्काळ बिल भरणा अपडेट न केल्यास तूमचे विज कनेक्शन कट करण्यात येईल, जर बिल भरणा केले असल्यास त्याबाबत ची माहिती अपडेट करीत आहोत.” असे सांगून तक्रारदार यांच्या   क्रेडीट कार्डवरुन सुमारे ०१,४५,३५५/- रुपये रक्कमेची फसवणुक केली त्याबाबत हितेंद्र यांनी सदर बाबत  दिनांक २०/०६/२०२३ रोजी सायबर गुन्हे कक्ष येथे प्राप्त झालेली होती.

नमूद तक्रारीबाबत तात्काळ तक्रारदार यांच्या झालेल्या  व्यवहाराबाबत सायबर कक्षाने माहिती प्राप्त केली. त्यावरून  तक्रारदार यांच्या  फसवणूक पेटीएम, एक्सीस बँकेचे खात्यावर ऑनलाईन व्यवहाराने पूढे दुसऱ्या ठिकाणी व्यवहार  करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून नमूद पेमेंट गेटवे, बँकेसोबत पत्रव्यवहार व पाठपूरावा करुन त्यापैकी पेटीएम पेमेंट गेटवेद्वोर फसवणूक रक्कम थांबविण्यात आली. तसेच फसवणूक रक्कम ०१,४५,३५५/- रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

  • अशा प्रकारे फसव्या कॉलला उत्तर देवू नये.
  • कॉल आलेल्या व्यक्तीकडे आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP तसेच इतर वैयक्तिक माहिती उघड करु नये. • कोणत्याही अनोळखी कॉल आल्यास त्याची विश्वासर्हता पडताळणी करावी.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे कक्षाचे पो. नि. श्री. सुजितकुमार गुंजकर, स.पो.नि. स्वप्नील वाव्हळ, पो.उप.नि. प्रसाद शेनोळकर, स.फौ. संतोष चव्हाण, म.पो. हवा. माधुरी धिंडे, पो. अंम. गणेश इलग, प्रविण आव्हाड, पल्लवी निकम, अमिना पठाण, सुवर्णा माळी, कुणाल सावळे यांनी केली आहे.

सायबर गुन्हे शाखा संपर्क क्रमांक :- ०२२-२८११ ०१३५

सायबर गुन्हे शाखा व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक

९०० ४८८०१३५

सायबर गुन्हे शाखा ई-मेल आयडी :- cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *