मिरारोड दि.(२०) :- गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा यांनी गुंगीकारक औषधे देऊन रिक्षा चालकाचे अंगावरील दागिन्यांची लुटमार करणा-या आरोपींना अटक. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बाप्पा सिताराम मंदिरासमोर, शांतीनगर, मिरारोड पुर्व हे दिनांक १६.०३.२०२३ रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या रिक्षातून प्रवाशांना घेवून बोरीवली ते मिरारोड असा प्रवास करीत असताना सदर प्रवाशी आरोपींनी आपसात संगनमत करुन रिक्षाचालकांस फ्रुटीमध्ये कोणतेतरी गुंगीकारक औषध मिक्स करुन पिण्यास दिले व ते बेशुध्द झाल्यावर त्यांचे गळयातील सुमारे १० ग्रॅम वजनाची ५०,०००/- रुपये किंमतीची सोन्याची चैन काढुन पळून गेले . झालेल्या फसवणुकीबाबत त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा यांनी गुन्हयाचा तपास करीत असताना गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्राप्त माहितीच्या अनुषंगाने गुन्हे करणारे आरोपी १) सागर महेंद्रभाई पारेख, रा. सुरत, गुजरात २) संपतराज ऊर्फ संपो गेवेरचंद (गेवरचंद) जैन, रा. अहमदाबाद, गुजरात, ३) सुभाष अरविंद पाटील, रा. अहमदाबाद, गुजरात यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न कबुल केल्याने पोलिसांनी त्यांना वर नमूद गुन्हयात अटककेली व त्यांच्याकडून गुन्हयात फसवणुक केलेला मुददेमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी वर नमूद अटक आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी फ्रुटी व पेढयामधुन गुंगीकारक औषध देऊन काशिमीरा, खडकपाडा कल्याण, बांद्रा, आंबोली, मुंबई या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे तपासादरम्यान माहिती मिळाली. त्यांच्याकडून सदर गुन्हयात जबरीने व फसवणुक करुन नेलेला ०५,९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून १.नयानगर पोलीस ठाणे २. काशिमीरा पोलीस ठाणे ३. काशिमीरा पोलीस ठाणे ४.खडाकपाडा पोलीस ठाणे, ठाणे शहर ५. बांद्रा पोलीस ठाणे, मुंबई शहर ६. आंबोली पो. ठाणे, मुंबई शहर याठिकाणी नमूद असलेले एकूण ०८ गुन्हे उघडकीस आणण्यात काशिमीरा पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीराचे पो. नि. श्री . अविराज कुराडे, स.पो.नि. पुष्पराज सुर्वे, राजु तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, पो.हवा. अविनाश गर्जे, समीर यादव, विकास राजपुत, सचिन सावंत, प्रफुल्ल पाटील, विकास राजपूत, समीर यादव, प्रशांत विसपुते तसेच स.फौ. संतोष चव्हाण, नेमणुक सायबर गुन्हे शाखा यांनी केली आहे.
