काशिमीरा : जबरी चोरी करणारे ३ आरोपी अटक करुन एकूण २७ मोबाईल्स व ऑटो रिक्षा असा २,९६,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत- काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हदीत फिर्यादी देव गोपी शर्मा, वय ३० वर्षे, राहणार – न्यु समीर, जैसल पार्क, भाईंदर पूर्व हे दिनांक ०३.०५.२०२३ रोजी संध्याकाळच्या सुमारास डॉन बॉस्को स्कुलकडे जाणाऱ्या वळणावर आले असता रिक्षामधुन ३ अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी यांना सही है वो असे बोलुन फिर्यादी यांच्या गालावर चापट मारुन त्यांच्या खिशातील Redmi कंपनीचा 5A मॉडेलचा सिल्व्हर रंगाचा मोबाइल फोन जबरीने चोरी करुन नेला त्याबाबत काशिमिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना मिरारोड पुर्व वेर्स्टन हॉटेलकडुन हाटकेश कडे जाणाऱ्या रोडवर आरोपी हे ऑटो रिक्षा मध्ये संशयास्पदरित्या वावरत असताना आढळून आल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाने नमुद रिक्षाचा पाठलाग करुन १ ) इरशाद अब्दुलरौफ अन्सारी, वय ३० वर्ष, रा. हमीद की चाळ, नालापार्क, भिवंडी, जिल्हा ठाणे. २) मोहसीन मेहमुद खान, वय २६ रा. जैतुनपुरा, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे. ३) शाहीद अख्तर अन्सारी, वय २७ वर्ष, रा. जैतुनपुरा, मंगलबजार स्लॅब, भिवंडी, ता.भिवंडी, जिल्हा ठाणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्या रिक्षाची पोलिसांनी झडती घेतली असता नमुद रिक्षाच्या प्रवासी सिटच्या मागे एक काळया रंगाच्या सॅक बॅगेत विविध कंपन्याचे एकूण २७ मोबाईल फोन मिळुन आले. सदर मोबाईल फोन व ऑटो रिक्षा ही पुढील तपासकामी पोलिसांनी ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांच्या कडे मिळुन आलेल्या मोबाईलपैकी Redmi कंपनीचा 5A मॉडेलचा सिल्व्हर रंगाचा मोबाईल फोन हा वरील नमुद गुन्हयात जबरी चोरी केलेला असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित मोबाइल्सबाबत अधिक तपास सुरु आहे. तसेच आरोपींच्या ताब्यात मिळुन आलेली ऑटो रिक्षा ही काशिमीरा पोलीस ठाणे, चोरीस गेलेली असुन सदरची रिक्षा आरोपी १) इरशाद अब्दुलरौफ अन्सारी, २) मोहसीन मेहमुद खान यांनी चोरी केलली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक ०३.०५.२०२३ रोजी अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रशांत गांगुर्डे हे करीत आहेत. अटक आरोपी हे जबरी चोरी व वाहन चोरी करणारे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत हे पोलिस तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.
सदर कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१, श्री. विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप कदम, पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत गांगुर्डे, पोलीस उप निरीक्षक श्री. निखिल चव्हाण, पोलीस उप निरीक्षक (श्रेणी) श्री. प्रकाश कावरे, पो.हवा. सचिन हुले, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, पो.अंम. रविंद्र कांबळे, प्रविण टोबरे सर्व नेमणुक काशिमीरा पोलीस ठाणे व पोहवा. जयप्रकाश जाधव म. पो.उ.आ. कार्यालय, परिमंडळ १ यांनी केलेली आहे.
