विरार : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांची कारवाई.वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणा-या वेश्या दलालास अटक करुन २ पिडीत महिलांची केली सुटका . मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली कि, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधीचौक, फुलपाडा, विरार पूर्व येथे राहत्या घरामध्ये एक वेश्यादलाल वेश्यागमननाकरीता मुली पुरविणार आहे व त्याबदल्यात मोबदला स्विकारणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा युनिटचे पो. नि. श्री. संतोष चौधरी यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन स्टाफ, दोन पंच, बोगस गि-हाईक यांचे सह वर नमुद ठिकाणी छापा कारवाई केली असता वेश्यादलाल परवीन प्रकाश यादव ही पिडीत महिला यांना पैशांचे आमिष दाखवुन त्यांच्याकडून वेगवेगळया ग्राहकांना वर नमुद ठिकाणी बोलावुन वेश्यागमनाकरीता महिलांना पुरवुन त्या बदल्यात गि-हाईकाकडुन पैश्याच्या रुपात मोबदला स्विकारत असताना मिळुन आले . सदर वेश्या दलालास पोलिसांनी ताब्यात घेतले असून व दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. नमूद महिला दलाला विरुध्द विरार पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपाराच युनिटचे पो. नि. श्री. संतोष चौधरी, पो. हवा. बापु पवार, रोशन नारायण किणी, विनोद अशोक राऊत, म.पो. हवा. सुप्रिया नथू तिवले, म.पो.अम. पुनम मधुकर जगदाळे, चालक पो.हवा. सुनिल विष्णु पागी, यांनी केली आहे.
