मिरारोड : १०५ ग्रॅम वजनाचा ०८,४०,०००/- रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करता साठा केलेल्या आरोपीवर परिमंडळ १, मिरारोड पथकाची कारवाई.दिनांक ०६/०५/२०२३ रोजी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, यांना गुप्त बातमीदारामार्फत माहितीमिळाली कि काशिमीरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात रेतीबंदर, घोडबंदर येथे एका चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री केली जात आहे.
मिळालेले माहितीच्या अनुषंगाने श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन पथकासह वर नमुद ठिकाणी छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी १०५ ग्रॅम वजनाचा ०८,४०,०००/- रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीता साठा केला असल्याचे दिसून आले . पोलिसांनी सदरचा मुद्देमाल जप्त केला असून सदर प्रकरणी आरोपी १) मरजहॉ ऊर्फ गुडीया ताजुद्दीन शेख, २) अली असगर हुसेन भाडेला, रा. रेतीबंदर, घोडबंदर यांच्याविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक ०६.०५.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त व श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, मिरारोड यांच्या अधिपत्याखाली स.पो.नि. दत्तुसाहेब लोंढे, स. फौ. अजय मांडोळे, पो.हवा. संतोष क्षिरसागर, विनोद चव्हाण, मिरारोड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. योगेश पाटील, पो. हवा. बबन हरणे, म.पो.अंम. भाग्यश्री माने तसेच काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी केली आहे.
