गाडीच्या डिकीतून २.२३ लाखांची चोरी; पोलिसांना फिर्याद देणाऱ्यालाच बेड्या.

Breaking News Crime News Cyber Crime Latest News Regional News

काशिगांव– दोन इसमांनी पोलिस असल्याची बतावणी करुन फिर्यादी यांचे २,२३,०००/ रक्कम गाडीच्या डिक्कीमधुन काढुन घेतले अशी फिर्याद देणाराच निघाला आरोपी, फिर्यादी यांस अटक करुन फसवणुकीचे २,२३,०००/रुपये हस्तगत करण्यात यश.- गुन्हे प्रकटीकरण कक्ष, काशिगांव पोलीस ठाणे यांची कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक ०८/१२/२०२५ रोजी तक्रारदार  सुशांत दशरथ मोहीते, वय ३६ वर्ष, व्यवसाय कन्स्ट्रक्शन सुपरवाईडार, रा. रुन नं. ५११ भिमनगर वर्तकनगर कोकाटे चाळ गणपती मंदीर जवळ, ता. जि. ठाणे यांनी काशिगांव पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली कि, दिनांक ०८/१२/२०२५ रोजी ०१.०० वा. च्या सुमारास तक्रारदार हे त्यांच्या दुचाकीने घोडबंदर रोड, काजुपाडा येथुन जात असतांना चेनागांव सिग्नल जवळ नाकाबंदी करिता उभ्या असलेल्या खाकी गणवेशातील दोन पोलिसांनी तक्रारदार यांची गाडी रोखुन त्यांच्याकडे गाडीचे कागदपत्रे व परवाना इत्यादी बाबत विचापुस केली असता फिर्यादी यांनी त्यांना त्यांचे गाडीचे कागदपत्रे व लायसन दाखविल्यानंतर त्या दोन पोलिसांनी गाडीची डिक्की चेक केली असता, डिक्की मध्ये फिर्यादी यांना त्यांच्या कंपनीचे मालक रामचंद्र सत्रे यांनी कंपनीच्या साईटवर कामगारांना देण्याकरिता सदर रक्कम दिली असल्याचे सांगितले त्यावेळी त्या दोन पोलिसांनी गाडीच्या डिक्कीमधील २,२३,०००/रुपये इतकी रक्कम काढुन घेवून ” निवडणुका चालु आहे तुम्ही ऐवढी रक्कम कोठुन आणली व कोठे देणार आहे? या बाबत खुलासा करण्याकरिता काशिमिरा पोलिस स्टेशन येथे या” असे सांगितले त्यावेळी फिर्यादी यांनी त्या दोन पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करुण सदर रक्कम घेवुन ते दोन पोलिस त्या ठिकाणाहुन निघुन गेले अशी हकीगत तक्रारदार यांनी काशिगांव पोलिस स्टेशन येथे येवुन सांगितली. तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन लागलीच त्या दोन तोतया पोलिसांविरुद्ध काशिगांव पोलिस स्टेशनला   गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठांनी सदर घटनेची खात्री करुन आरोपींचा  शोध घेवुन त्यांना अटक करण्याच्या सुचना काशिगांव पोलिस स्टेशनला दिल्या होत्या.

गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळावर व फिर्यादी यांच्याकडे कौशल्यपूर्ण केलेल्या तपासात नमुद गुन्हा फिर्यादी सुशांत मोहिते यांनीच तो काम करत असलेल्या सत्रे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पैश्याचा अपहार करण्याकरिता वरिल नमुद योजना आखून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.कन्स्ट्रक्शन नमुद गुन्ह्यात फिर्यादी १) सुशांत दशरथ मोहीते,  व त्याचा साथीदार २) राणु उर्फ ओंकार अंकुश भदर्ग, वय २९ वर्ष, व्य नोकरी, रा. ०३ अप्पा इंदिसे चाळ, शास्त्रानगर, पोखरण रोड ०१ जि ठाणे यांना अटक करण्यात आली असुन अटक आरोपींकडुन नमुद गुन्ह्यातील २,२३,०००/रु. रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक, पोलिस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस आयुक्त, मा. श्री. संदिप डोईफोडे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) अतिरिक्त प्रभार परिमंडळ ०१, श्री. गणपत पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त, मिरारोड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटिल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काशिगांव पोलिस स्टेशन, संजय पुजारी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत लांडे, विजय साठे, पोलिस उप निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो.हवा/प्रताप पांचुदे, पो.हवा/जयप्रकाश जाधव, पोलीस अंमलदार/ किरण विरकर, विक्रांत खंदारे, उमंग चौधरी, प्रविण टोबर, नामदेव देवकाते, अभिषेक मडाची यांनी केली आहे.

Police Batmi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *